दि.१३/९/२०२३.
आपण आकाशात पाहतो तेव्हा आपल्याला सूर्य आणि त्यामागील नक्षत्र दोन्ही दिसत असतात. पण , जेव्हा पृथ्वीची स्थिती बदलते, तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला असे दिसते की सूर्य त्याच्या स्थानावरून हलला आहे आणि नवीन नक्षत्र किंवा नक्षत्रात प्रवेश करत आहे
सूर्य ठरावीक काळानंतर एका तारका समूहा मधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे (तारकापुंज) येतात. ही २। (सव्वा दोन) नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी ‘ *वसंतसंपात’* बिंदू *मेष* राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
अभिजित नावाचे एक २८वे एक-चरणी नक्षत्र मानले जाते. हे छोटे नक्षत्र उत्तराषाढा आणि श्रवण या नक्षत्रांदरम्यान येते. अभिजित नक्षत्रात सूर्य २१ ते २३ जानेवारी या काळात असतो.
प्रत्येक नक्षत्राचे चार चरण (भाग) आहेत अशी कल्पना केली आहे. त्यामुळे काही पूर्ण नक्षत्रे व काही नक्षत्रांचे काही चरण मिळून एक रास बनते. एका राशीत २। (सव्वा दोन) नक्षत्रे म्हणजे नक्षत्रांचे एकूण नऊ चरण असतात. चरण दाखवण्याची पद्धत अशी :- आश्विनी-१, मृग-२, चित्रा-३, ४, विशाखा-४ म्हणजे अनुक्रमे – आश्विनी नक्षत्राचा पहिला चरण, मृगाचा दुसरा, चित्राचा तिसरा व चौथा चरण, आणि विशाखाचा चौथा चरण.
लक्षात ठेवा की नक्षत्र वास्तविक वस्तू नाहीत; पृथ्वीवरील आपल्या निरिक्षण बिंदूवरील ते केवळ नमुने आहेत .
उत्तराषाढा व उत्तरा भाद्रपदा,उत्तरा फाल्गुनी अशी उत्तरा नावाने सुरू होणारी तीन नक्षत्रे आहेत. त्यापैकी उत्तरा फाल्गुनी , व उत्तराषाढा हि पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी दोन पावसाची नक्षत्रे आहेत.
बेडूक, मोर, म्हैस, हत्ती असे वाहन असेल तर सर्वसाधारणतः पाऊस समाधानकारक पडतो. असा अंदाज बांधला जातो.
असे अंदाज बांधण्यासाठी,व ज्योतिषशास्त्राला मदतीसाठी हे नक्षत्रांचे काल्पनिक भाग पुरातन कालापासून मानले गेले आहेत.
*संदर्भ -गुगल.*
**सौ.वंदना* *गोखले.-9822583999.*
*तेजस्विनी शाखा.*
सौजन्य – सामिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र