आशिया कप 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने झेल घेत श्रीलंकेचा शेवटचा गडी बाद केला. यामुळे भारताने सुपर-4 मधील सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. रोहित शर्माने श्रीलंकेच्या खेळाडूचा कॅच घेताच विराट कोहलीने धावत जाऊन त्याला कडकडून मिठी मारली. हे दृश्य चाहत्यांच्या मनात घर करून गेले.
आशिया चषक 2023 स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवला. भारताने श्रीलंके समोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांवर आटोपला. टीम इंडियाच्या फलंदाजीमुळे श्रीलंकेची आघाडीची फलंदाजी फेल ठरली
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी सध्या विशेष फॉर्ममध्ये आहे . कारण या जोडीने आशिया कप २०२३ मध्ये वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. या जोडीने आज आणखी एक विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी करत पाच हजार धावा पूर्ण केल्या आहेत.