जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिकताई भिडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिक भिडे यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.
गेल्या काही वर्षांपासून माणिक भिडे यांना पार्किन्सन्स या असाध्य व्याधीने ग्रासले होते त्यावर उपचारही सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
माणिक भिडे यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.काही वर्षांपूर्वी संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.