विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतल्या घरी आज आयोजीत करण्यात आलेली आहे.विरोधकांच्या आघाडीच्या आता पर्यंत तीन बैठका पार पडल्या मात्र त्यात जागावाटपाबद्दल एकमत झालेले नाही.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपा बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.तसेच आगामी निवडणूकीची रणनितीही ठरवली जाणार आहे.तसेच इंडिया आघाडीच्या लोगोबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच पाच शहरात रॅली काढण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.