अरब देशातल्या लीबिया इथे डॅनियल वादळामुळे देशाच्या पूर्वेकडील भागात तीव्र पाऊस आणि पूर आल्याने महापूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.या पूराचा सर्वाधिक फटका डेरना या शहराला बसला आहे. येथे ७०० लोक गाडले गेले आहेत तर मृतांचा आकडा खूप मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण या पूरात १०,००० लोक बेपत्ता आहेत. लीबियात झालेल्या भीषण पावसामुळे आलेल्या पूराने सगळीकडे पाणी भरले असून देशात आतापर्यंत ५,२०० हून अधिक मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीनंतर बांध फुटल्यामुळे पाण्याचे लोट वाहू लागल्याने लिबियातील अनेक शहरे जलमय झाली आहे. काही ठिकाणी तर भीषण परिस्थिती असून पाणी ओसरत नसल्यामुळे शेकडो मृतदेह हाती लागत नसल्याने बचाव यंत्रणांना मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
संपूर्ण परिसर समुद्रात वाहून गेला आहे. पूर्वेकडील लिबियन नॅशनल आर्मी (एलएनए) चे प्रवक्ते अहमद मिसारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकट्या डेरना शहरात 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर 5,000 ते 6,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत.भीषण पूरामुळे प्रशासनाला मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत. लीबियातील माजी सरकारमधील आरोग्य मंत्री उस्मान अब्दुल जलील यांनी देशातील परिस्थिती भयावह असल्याचे सांगितले