“रशियाच्या सहकारी देशाकडून शिकण्यासारखे आहे, यात भारताचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी भारतात उत्पादित केलेल्या कर आणि जहाजांच्या उत्पादनावर आणि वापरावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात तयार झालेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे योग्य काम करत आहेत. रशियात देखील ती वाहने उपलब्ध आहेत. ती वाहने आपण वापरली पाहिजेत” असे म्हणत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.
नुकतीच भारतात G20 शिखर परिषद पार पडली. यावेळी परिषदेला पुतीन यांनी हजेरी लावली नसली तरी आपली भारतासोबत पुतीन यांची असलेली मैत्री निभावताना पाहायला मिळाले.