भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुण्यात दाखल झाले आहेत. आजपासून ३ दिवस पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवर संघाची बैठक पार पडणार आहे. यासाठी दिग्गज मान्यवरांनी पुण्यात हजेरी लावली आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, सामाजिक एकोपा स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये पार पाडणे या विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे. संघाशी संलग्न 36 संघटना वार्षिक संमेलनात भाग घेणार आहेत, ज्यात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उपस्थित राहणार आहेत.