आजपासून शिवसेनेच्या आमदार पात्र-अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरवात झाली होती.मात्र ठाकरे-शिंदे गट ही सुनावणी पुन्हा एकदा लांबली असून आता 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाला याचिकेत दाखल केलेली कागदपत्र प्राप्त न झाल्याने बाजू मांडण्यास अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे दोन आठवड्याचा वेळ द्यावा अशी विनंती शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यामुळे आता एक आठवड्याचा वेळ दोन्ही गटांना कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी व त्यानंतर लेखी म्हणणे मांडण्यासाठी देण्यात आला आहे.