अभिजित जोग लिखित ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात होणार आहे. हे प्रकाशन रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडणार आहे. जगभरात डाव्या विचारसरणीने जगाला कसे पोखरले आहे याची अभ्यासपूर्ण मांडणी अभिजित जोग यांनी या पुस्तकात केली आहे. या प्रकाशन सोहळ्याला दिल्लीतील जवाहरलाल नेहेरु विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री पंडित या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला असणार आहे.