महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसने प्रवाशांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना जास्त फायदा होणार असून प्रवासासाठी निश्चित जागा मिळणार आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आरक्षित जागेची सोय व्हावी यासाठी रेल्वेच्या वेबसाइटसोबत सामंजस्य करार केला असून लवकरच एसटीच्या प्रवाशांना आता आयआरसीटीसी वरून आपले तिकीट बुक करता येणार आहे.
देशभरात रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी देशभरातून या वेबसाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यासोबतच या साईटद्वारे इतर सुविधाही पुरवल्या जातात यामध्ये विमानसेवा, हॉटेल बुकिंग इत्यादींचा समावेश आहे. आता एसटीच्या तिकिटांकरिता प्रवाशांना सहज शक्य होईल अशी सोया होणार आहे.