इंडिया आघाडीने तब्बल १४ न्यूज अँकरना बहिष्कृत केले आहे. या १४ न्यूज अँकरची नवे एका यादी द्वारे प्रसिद्ध केली असून ‘आम्ही द्वेषाच्या बाजारात जाऊ इच्छित नाही, आमचे द्वेषमुक्त भारत’ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारण इंडिया आघाडीकडून देण्यात आले आहे. दरम्यान हे सर्व न्यूज अँकर विविध चॅनेल वरील होस्ट आहेत. अदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव आरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा अशी या अँकरची नावे आहेत. हे सर्व देशातील आघाडीचे अँकर असून यांची मोठी कामगिरी देशाने यापूर्वी पहिली आहे.