मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीच्या जेवणात मृत उंदीर आढळल्याने खळबळ उडाली होती. हॉटेलमध्ये सर्व नियमांचं पालन करून ऍन पदार्थ बनवले जातात का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणारी हि घटना असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने तात्काळ अशा हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या माध्यमातून मुंबईतील नामांकित हॉटेल चालकांना हॉटेल बंद करण्याची वेळ अली आहे. एफडीएने मुंबईतील तब्बल ७० हॉटेल्सवर कारवाई केली असून हि कारवाई गेल्या १५ दिवसात झाली आहे.
‘पापा पन्चो दा ढाबा’मध्ये जेवणात मृत उंदीर सापडल्याने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याची दखल घेत एफडीएने शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सची पाहणी सुरू केली आहे.७० पैकी नियमांची पूर्तता करेपर्यंत सहा नामांकित हॉटेल्सना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.