जवान हा शाहरुख खानचा चित्रपट पुढील काही दिवसांत कमाईचे नवे विक्रम रचणार असल्याची शक्यता आहे. अटली दिग्दर्शित या चित्रपटाचा हा दुसरा आठवडा आहे.
जवान’ने प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. पुढील काही दिवसांत ‘जवान’ हा शाहरुखच्याच ‘पठाण’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. पठाणने देशभरात 543 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘जवान’च्या जगभरातील कमाईच्या आकड्याने 660 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला समिक्षकांनी चांगले रेटिंग दिले आहेत. किंग खानसोबतच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लहर खान, संजीता चॅटर्जी यांच्याही या चित्रपटामध्ये भूमिका आहेत.