ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला .त्यानंतर प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. तर आता हा चित्रपट ओटीटीवर दाखल झाला आहे.
बार्बी या चित्रपटावर भारतात संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या .अनेक जण गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून हा चित्रपट पाहताना दिसले , तर दुसरीकडे काहींनी या चित्रपटात दाखवलेल्या दृश्यांवर टीका केली. पण तरीही या चित्रपटाने जगभरातून १.४८ बिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे
आता हा ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मात्र हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर भाडे तत्त्वावर उपलब्ध झाला आहे.हा चित्रपट जर प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा असेल तर ४९९ रुपये द्यावे लागणार आहेत.
‘बार्बी’ या चित्रपटात मार्गोट रॉबी व रायन गॉस्लिंगव्यतिरिक्त अमेरिका फेरेरा, सिमू लियू, केट मॅकिनॉन, मायकल सेरा, हेलेन मिरेन, एरियाना ग्रीनब्लाट यांसारखे जबरदस्त कलाकार आहेत.