मदरलँड फाउंडेशनतर्फे प्रकाशित करण्यात येणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वंदे मातरम् हि काव्यांजली उद्या म्हणजे १७सप्टेंबर रोजी दिल्लीतून लोकार्पित होणार आहे. मोदींच्या वाढदिसाचे औचित्य साधून हे लोकार्पण केले जाणार आहे. या पूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काव्यांजलींनी रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. आता पंतप्रधान मोदींची काव्यांजली रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
संगीतकार संजय हांडे यांनी हि काव्यांजली संगीतबद्ध केली आहे, तर रा. स्व. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असणारे इंद्रेशकुमार यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे.