आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असला तरी खरी भेट देशातील जनतेला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी वाढदिवसानिमित्त देशातील जनतेसाठी अनेक योजनांचा शुभारंभ करणार आहेत.विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी देशातील कोट्यवधी कामगारांसाठी एक विशेष योजना सुरू करणार आहेत.
पंतप्रधान मोदी देशभरातील लाखो कामगारांसाठी ‘पीएम विश्वकर्मा’ योजना देशाला समर्पित करणार आहेत. या योजनेंतर्गत कामगारांच्या कल्याणासाठी सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच पंतप्रधान आजच नवीन संसद भवनावर ध्वजारोहण करू शकतात.असेही सांगितले जात आहे. भाजप कडूनही या काळात देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालय ‘आयुष्यमान भव’ कार्यक्रम राबवणार आहे. माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, या कार्यक्रमामुळे समाजाच्या शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंतच्या सर्व लोकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळेल.