आज 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देश-विदेशातील अनेक बडे नेते त्यांचे अभिनंदन करत आहेत.विरोधकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधानांचे अभिष्टचिंतन केले आहे.
My best wishes to PM Shri Narendra Modi ji on his birthday. May he be blessed with good health and long life. @narendramodi
त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
माँ भारती के परम उपासक, ‘नए भारत’ के शिल्पकार, ‘विकसित भारत’ के स्वप्नद्रष्टा, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ के प्रति संकल्पित, विश्व के सर्वाधिक लोकप्रिय राजनेता, देश के यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी को जन्मदिन की हार्दिक बधाई! ‘विकसित भारत’ के निर्माण के लिए आपका समर्पण और विजन अतुलनीय है। प्रभु श्री राम की कृपा से आपको दीर्घायु एवं उत्तम स्वास्थ्य की प्राप्ति हो, आपका यशस्वी नेतृत्व हम सभी को प्राप्त होता रहे, यही प्रार्थना है।
तसेच बॉलीवुड मधल्या सेलिब्रिटींनीही पंतप्रधान मोदींना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते अनुपम खेर, राजकुमार राव, परेश रावल, टायगर श्रॉफ, तुषार कपूर आणि कमल हासन यांनी पोस्ट शेयर करुन मोदींचे अभिष्टचिंतन केले आहे.तसेच कंगना राणावत हिने विशेष पद्धतींने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने मोदींची तुलना चक्क भगवान राम यांच्यासोबत केल्याने सोशल मीडियावर कंगना चर्चेत आली आहे.
Happy birthday to the most loved leader in the world, an ordinary man who rose to the heights of empowerment through his hard work and perseverance and became the architect of New Bharat. You are not just a Prime Minister for the people of Bharat, like Lord Rama your name is etched in the consciousness of this nation forever. Wishing you a long and healthy life sir @narendramodi #HappyBirthdayModiJi #NarendraModi #narendramodibirthday
कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो आणि पोस्ट शेयर केला आहे. त्यात तिने मोदीं यांना सर्वाधिक प्रेम मिळालेले नेतृत्व असे म्हणत त्यांची तुलना भगवान राम यांच्यासोबत केली आहे