अंतिम सामन्यात दिमाखदार कामगिरी करत भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताने श्रीलंकेला पाचव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये मात दिली आहे.शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी झटपट फलंदाजी करत विजय मिळवून दिला.श्रीलंकेच्या नावावर पुन्हा एकदा लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडला. ३० ऑगस्टपासून आशिया कप २०२३ मॅच सुरु झाली होती. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता.
श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेकीनंतर कोलंबोमध्ये पाऊस पडला मात्र थोड्या वेळात पाऊस गेला आणि मॅच सुरु झाली.
मात्र जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले आणि श्रीलंकेचा अर्धा संघ अघ्या १२ धावांत तंबूत परतला. तसेच मोहम्मद सिराज याने सहा विकेट घेत श्रीलंकेची अवस्था बिकट केली.
सिराजने घेतलेल्या 6 विकेट्सच्या जोरावर भारताने श्रीलंकेला 50 धावात गुंडाळले. त्यााला हार्दिक पांड्याने 3 तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. श्रीलंकेची ही वनडे क्रिकेटमधील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे भारताने गतवर्षीच्या आशिया कपचे विजेते श्रीलंकेची ही दयनीय अवस्था त्यांच्यात देशात केली.
टीम इंडियाच्या डावाला सुरुवात. झाली असून अवघ्या ५१ धांवाचे लक्ष्य भारतासमोर होते तीन षटकानंतर टीम इंडियाच्या 32 धावा झाल्या तेव्हाच टीम इंडिया आशिया चषक घेऊनच भारतात परतणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.