नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाने शाहरुखच्या गालावर किस केलेला फोटो व्हायरल झाला आहे. हाच फोटो दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला असून या फोटो खाली दीपिकाचा पती रणवीर सिंग याने जी कमेंट केली आहे त्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फोटोमुळे नेटकऱ्यांनी दीपिका, रणवीर आणि शाहरुख यांना चांगलेच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. दीपकाने शेअर केलेले या फोटोवर नेटकऱ्यांनी अनेक सवाल केले आहेत; त्यापैकी बॉलीवूड नक्की काय सांगू इच्छितं? असा आहे एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला आहे! आपली पत्नी दुसऱ्या एका पुरुषाला किस करताना पती इतका निर्लज्ज कसा असू शकतो? अशी परखड प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून विविध देश विरोधी कृतींमध्ये चर्चेत असलेल्या शाहरुख खानचे मागील अनेक चित्रपट फ्लॉप झालेले पाहायला मिळाले. या सगळ्या घडामोडीनंतर नुकत्याच प्रदर्शित झालेला जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.