उद्या गणपतीबाप्पा विराजमान होत आहेत; यानिमित्ताने विविध शहरातील ढोल पथके बाप्पाच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. जवळपास तीन महिन्यांपासून या पथकांचा सराव सुरू असतो. अखेर उद्या बाप्पा येणार आहे त्यामुळे ढोल पथकांचा आनंद शिगेला पोहोचला असून सर्व वादक आपल्या वाद्यांना नीटनेटके करण्याचे काम करत आहेत.
एक सारख्या पारंपारिक वेशात एकसारख्या, तालात आणि शिस्तीचे अनोखे दर्शन घडवणारे हे ढोल वादक आता उद्या बाप्पाला दिमाखदार सोहळ्यात आणण्यासाठी अतुर झाले आहेत!