गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे:-
“गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सदिच्छा व्यक्त करते.
गणेश चतुर्थीचा हा उत्सव भगवान श्री गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो जो ज्ञान, विवेक आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उत्साह, उमेद आणि आनंदाचा हा उत्सव आहे. हा सण एकत्र काम करण्याचा संदेश देतो आणि जीवनात नम्र राहण्याची आणि समाजात शांतता आणि बंधुत्व वृद्धिंगत करण्याची प्रेरणा देतो.
भगवान श्री गणेश आपल्याला सर्व अडथळ्यांवर मात करण्यास मदत करो जेणेकरुन आपण विकसित राष्ट्राच्या उभारणीत मोठे योगदान देऊ शकू.”
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2023/sep/doc2023918253601.pdf