समाजमाध्यमे वापरात देशात बाल आणि तरुण पिढी आघाडीवर आहे. समाजमाध्यमांच्या वापरासाठी सध्या तरी कोणत्या वयोमर्यादेची अट नाही. परंतु यासाठी एक निश्चित वयोमर्यादा असायला हवी अशी महत्वपूर्ण टिपण्णी कर्नाटक उच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे कि, “दारू पिण्यासाठी एक वयोमर्यादा निश्चित असू शकते, तर समाज माध्यमे वापरण्यासाठीही एक वयोमर्यादा निश्चित केली जाऊ शकते”. न्यायमूर्ती जी. नरेंद्र आणि न्यायमूर्ती विजयकुमार ए. पाटील यांच्या खंडपीठाने ३० जूनच्या एकल न्यायाधीशांच्या याचिकेला आव्हान देणाऱ्या ‘ट्विटरच्या’ अपिलावर सुनावणी करताना हि टिपण्णी केली आहे.