महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात देवेंद्र फडणवीस यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागतही करण्यात आले.तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे दौऱ्याच्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले.