आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्याला आज मोहालीच्या मैदानावर सुरवात झाली आहे. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १. ३० वाजता खेळले जाणार आहेत.
भारताचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला उतरले होते, मात्र सध्या ऑस्ट्रेलिया तीन बाद ११२ धावांवर खेळत आहे.
वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे.आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात १४६ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने ८२ सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ ५४ सामन्यांमध्ये यश मिळाले आहे.
यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौर आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे.