शिंदे गट आणि ठाकरे गट आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे . सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्देश देताना यावर पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी.अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचे टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.