एक देश एक निवडणूक समितीची आज पहिली अधिकृत बैठक दिल्लीत पार पडणार आहे. दिल्लीत माजी राष्ट्रपती आणि समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. दरम्यान ‘एक देश, एक निवडणूक’ बैठकीमध्ये पुढील कामाचा आरखडा कसा तयार करायचा याबाबत चर्चा पार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एक देश एक निवडणूक धोरणाच्या रोडमॅपवर समिती चर्चा करेल. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत निवडणुका एकत्र घेण्यासंबंधी धोरणावर चर्चा होईल.वन नेशन, वन इलेक्शन समितीची अधिसूचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे असतील. तसेच गृहमंत्री अमित शाह , लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एन के सिंह, सुभाष सी कश्यप, हरीश साळवे, संजय कोठारी यांचाही या समितीत समावेश आहे.
2 सप्टेंबरला सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ संदर्भात समिती गठीत केली होती .