नागपुरातील पावसामुळे उडाला हाहाःकार, विजेचा कडकडाट अन् मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो
नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक पावसाने जोर धरला आणि रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसानागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक पावसाने जोर धरला आणि रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला.
कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. आणि या तलावाचे पाणी नागपुरच्या सखल भागात शिरले काही वेळात सर्व वाहून गेले.मोरभवन बसस्थानक चार ते पाच फूट पाण्याखाली गेल्याने बसस्थानकाला नदीचे रूप आले आहे तर बसस्थानकातील सर्व बसेस पाण्याखाली बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.
बसस्थानकात पाणी शिरल्याने काही चालक आणि वाहक बसमध्ये अडकल्याने त्यांना एसटीच्या छतावर थांबून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहे. पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावर, घरांमध्ये पाणी आले असून रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत आहेत.
नागपुरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपुरात रात्री १०६ मिमी पावसाची हवामान खात्याने नोंद केली आहे. रात्री अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरात पाणीत शिरले आहे. प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे .