नागपुरात पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.NDRF चे पथक पहाटेपासून तैनात करण्यात आले आहे. आत्तापर्यंत अनेक जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.नागपुरात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजोरी लावली आहे. एका रात्रीत १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक सखोल भागात पाणी शिरले आहे. नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे, त्यामुळे अनेकांची रात्र पाण्यात गेली आहे. हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नागपुरात पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली.दरम्यान जिल्हाधिकारी, आयुक्तांचेही परिस्थितीवर लक्ष आहे.
2 SDRF पथक आणि 2 NDRF पथक नागपूर शहरातील विविध भागात बचाव कार्य करत आहेत. एसडीआरएफच्या एका पथकाने नुकतेच ४० मूकबधिर विद्यार्थ्यांना वाचवले आहे. एसडीआरएफ टीमने आतापर्यंत सुमारे १०५ जणांची सुटका केली आहे तर एनडीआरएफ टीमने ३५ जणांची सुटका केली आहे.
आतापर्यंत नागपुरात जवळपास ४०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. या पावसामुळे १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संध्याकाळी नागपूरला जाणार आहेत.