बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. चुडा समारंभासह आज या दोघांचा विवाहसोहळ्याला सुरवात होणार आहे. मुख्य विधी उद्या म्हणजे २४ सप्टेंबरला पार पडतील.
राजस्थान मधील उदयपूर येथे हा ग्रँड सोहळा होणार आहे.विवाहाचे काही विधी लीला पॅलेस मध्ये तर मुख्य विवाह सोहळा ताज तलाव येथे पार पडणार आहे.
परिणीती आणि राघव यांचं लग्न हे शीख पद्धतीने आणि परंपरेनुसार होणार आहे. काही विधी हे दिल्लीत होणार आहेत,
दरम्यान, आज सकाळी परिणीती चोप्राची बहीण आणि बॉलीवूड मधली अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टा पोस्टद्वारे सेलिब्रिटी जोडप्याचे अभिनंदन केले. यावरून ती या लग्नाला येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
22 सप्टेंबर रोजी चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय उदयपूरला पोहोचले आहेत . हळूहळू इतरही पाहुणे तिथे पोहोचत आहेत. उदयपूर एअरपोर्टवरून सर्व पाहुण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहेत.
परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, छत्तीसगड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि अशोक गहलोत उपस्थित राहणार आहेत .