कॅनडात ठार झालेला खलिस्तानी नेता हरदीप सिंह निज्जर याच्या पंजाबमधील घराची जप्ती करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार त्याच्या घरावर जप्तीची नोटीसही चिकटवण्यात आली आहे.
दहशतवादी कारवायात गुंतलेल्या आणि कॅनडाचे नागरिकत्व घेतलेल्या निज्जरच्या हत्येवरुन सध्या कॅनडा आणि भारतातील संबंध तणावाचे बनले आहेत.
हरदीपसिंह निज्जर हा खलिस्तानी चळवळीचा नेता असून कॅनडाचा नागरिक होता. कॅनडातच एका गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पण या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केला होता. त्यानंतर तातडीने भारताकडून यावर उत्तर देण्यात आले होते.
खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा पंजाबमधील जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा तो रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर खलिस्तानी चळवळीला मदत करत असल्याबद्दल आणि फुटीरतावादी कार्यात सहभागाबद्दल त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याने 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. तसेच बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता. शिख तरुणांची माथी भडकवण्यासाठी तो काम करत होता.
Tags: NULL