विश्वचषकाआधी टीम इंडियाचा दबदबा वाढल्याचे दिसून येत आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मोहालीतील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत भारताने वनडेमध्येही पहिल्या स्थानावर आपले नाव नक्की केले आहे. याआधी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक पटकवण्याचा विक्रम आधी दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर होता. आता तो भारताच्या नावावर झाला आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाचे ११५ रेटिंग गुण आहेत. भारताशिवाय पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे टॉप-१० संघांमध्ये आहेत. तर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११८ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
आयसीसीच्या क्रमवारीवर फक्त भारतीय संघच नव्हे तर खेळाडूही अव्वल नंबरवर वनडे, कसोटी आणि टी२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. टी२० मधील आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. तर वनडेमधील अव्वल गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. कसोटी गोलंदाजीत आर. अश्विन पहिल्या स्थानावर आहे. तर कसोटीमध्ये रविंद्र जाडेजा नंबर एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर आर. अश्विन नंबर दोन अष्टपैलू खेळाडू आहे. वनडेमध्ये शुभमन गिल फलंदाजीत दुसऱ्या क्रमांकावर आहे