भारतीय रेल्वेने महसूल वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. या योजनेतंर्गत अनेक सुविधा रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आले आहे. आता मध्य रेल्वेने मुंबई विभागाच्या काही स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकातच चित्रपट पाहण्याचा आनंद मिळणार आहे.
सध्या स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकात सिने डोम उभारण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. सिने डोम हा ग्राहक/अभ्यागत/पाहुण्यांसाठी जेवण/नाश्ता/पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण वेगळी व्यवस्था असणार आहे. मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी मात्र दिली जाणार नाही.
सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू (NFR) उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.स्थानकात पाच हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे.