आज १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर विजय मिळवत रोमहर्षक कामगिरी केली आहे. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिळवलेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते.
भारताच्या वुमन्स क्रिकेट टीमने पहिल्याच झटक्यात गोल्ड मेडल पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी ११७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये ९७ धावांवरच रोखले .
टीम इंडियाकडून तितास साधू हिने सर्वाधिक म्हणजे 3 विकेट्स घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड हिने 2 विकेट्स घेत श्रीलंकेला रोखले . तसेच दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आणि देविका वैद्य या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
महिला क्रिकेटर्सच्या या केलेल्या या कामगिरीसाठी सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे.