आपल्या सकस अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने सर्व रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर नुकतीच या ५३ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, वहिदा रेहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे.
https://x.com/ianuragthakur/status/1706565710540083673?s=20
भारतीय हिंदी सिनेसृष्टीमध्ये हा पुरस्कार विशेष प्रतिष्ठेचा समजला जातो.
हिंदी चित्रपटांमधील अनेक भूमिकांसाठी समीक्षकांनी वहिदा यांची प्रशंसा केली होती. त्यामध्ये प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी अशा अनेक प्रमुख चित्रपटांचा सामावेश आहे.
गतवर्षी हा पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता