भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Tags: NULL