सेवा, सुरक्षा, संस्कार…
देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे..
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल
मुंबई क्षेत्र आयोजित छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा
दि. ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२३
२०२४ हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्टिपूर्ती वर्ष आहे. यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ ते श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ या कालावधीत देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्यविभागांच्या सहभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या षष्टिपूर्ती वर्ष निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचा युवा संगठन कार्यविभाग बजरंग दल पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्कारांचे व्यापक जनजागरण करण्यासाठी शौर्य जागरण यात्रा आयोजित करणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५०वे वर्ष आहे. श्री शिवछत्रपती हे हिंदूंचे परमोच्च आदर्श आहेत. तत्कालीन सर्व परकीय धर्मांध, लुटारू, जिहादी शक्तींना श्री. शिवरायांनी पराभूत करून हिंदूंचे सार्वभौम सिंहासन निर्माण केले. व याचाच आदर्श समोर ठेवून शिवरायांना मानवंदना व शिवराज्याभिषेकाचा कालावधी या दुग्धशर्करा योगावर या शौर्य यात्रेचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा, बजरंग दल हे निश्चित झाले आहे. हिंदू समाज हा शौर्यवान आहेच व अनेक शतके हिंदुस्थानावर होत असलेल्या आक्रमणांना विजयी उत्तर हिंदूंनी दिले आहे. याच शौर्याचे हिंदू समाजात पुनर् जागरण व्हावे या उद्देशाने ही जागरण यात्रा पुर्ण महाराष्ट्र व गोवा या राज्यांमधून प्रवास करणार आहे.
या पवित्र यात्रेत आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
आपले,
श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा संयोजन समिती,
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे