आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चौथ्या दिवशी पुन्हा एकदा यशाला गवसणी घालत अजून एका सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
बुधवारी हांगझो येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत त्यांनी ही सुवर्ण कामगिरी केली आहे. नेमबाजीतील भारताचे हे सहावे पदक आहे. याआधी दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल गटात विश्वविक्रमी सुवर्णपदक पटकावले होते.
याचसोबत आशी चौकसे, मानिनी कौशिक आणि सिफ्ट कौर समारा या भारतीय नेमबाजी त्रिकूटाने महिलांच्या 50 मीटर रायफल 3P सांघिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे.तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफल संघात मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौकसे या त्रिकुटाला रौप्यपदक मिळाले.रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही मिळवले आहे.