भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना राजकोटच्या मैदानावर आज खेळला जात आहे. या अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघही पूर्णपणे बदललेला आहे. भारतीय संघामध्ये सहा बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर, अश्विन आणि मोहम्मद शामी हे खेळाडूही प्लेईंग ११ मध्ये नाहीत.
राजकोटच्या मैदानावर ह्या सामन्याला सुरवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ल्डकप तोंडावर असताना ही सिरीज खूप महत्त्वाची मानली जात आहे .भारतीय टीम हा सामना जिंकून सलग तिसरी वनडे जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. हा सामना जिंकून भारत प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप करू शकतो.या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे.
भारताने ही मालिका 2 – 0 ने आधीच जिंकली असल्याने आजचा सामना म्हणजे फक्त औपचारिकता असणार आहे.