आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला ठिकठिकाणी गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुण्यातही लाडक्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.
मुंबईमध्ये राजा तेजुकायाचा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांकडूनही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निघणार असून, तिथून परळमधून नरेपार्क- परळचा राजा, लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोस्टगल्लीचा राजा असे बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.
मानाचा पहिला मुंबईचा राजा मार्गस्थ झाला आहे. भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यात थोड्याच वेळात गणपती विसर्जन मिरवणुका सुरु होत आहे. पुण्यातील मंडई चौकापासून विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिल्या मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणूक सुरू होणार आहे.