कोल्हापूर शहरातील पहिला मानाची गणपती म्हणून तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीला मान आहे. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मार्गस्थ झाल्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरु होते.या गणपतीची मिरवणूक निघताना सर्वपक्षीय नेत्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.तसेच ढोल पथकांनी धरलेला ताल यावेळेस बघायला मिळाला.
कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीत चांद्रयान, सूर्ययान अवतरणार आहे. तालमींचे विसर्जन मिरवणुकीत नेहमीच आकर्षण असते. शहरातील सर्वच तालीम मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष तयारी केली आहे.पारंपरिक वाद्ये, लेझर लाईट, डीजे सुद्धा मिरवणुकीत असणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत धनगरी ढोलही आकर्षण असणार आहेत. एलईडी स्क्रीनही विसर्जन मिरवणुकीत असणार आहे.
सांगलीत मिरज शहरामध्ये स्वागत कमान उभारण्याची परंपरा कायम आहे. गेल्या 40 वर्षांपासून विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य स्वागत कमान उभारल्या गेल्या आहेत. यंदा राम मंदिर ,छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, महिलांचा आदर करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातील प्रसंग अश्या वेगवेगळ्या प्रतिकृती स्वागत कमानीवर साकारण्यात आल्या आहेत.