पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मार्गस्थ झाला आहे. भाऊ साहेब रंगारी गणेश मंडळाने यावर्षी विसर्जनांसाठी आकर्षक मयूर रथ साकारला आहे.
परंपरेप्रमाणे चंडा वादन करत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सव मंडपातून मंदिराकडे रवाना झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.दुपारी 3.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते अभिषेक झाल्यानंतर 4 वाजता मिरवणूकीसाठी निघणार आहे.
पुण्याच्या लक्ष्मी रोडवर मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी येऊन पोचले आहेत. पुण्यात शंखनाद करणारे तरुण तरुणींचे पथक या मिरवणुकीचे आकर्षण ठरले आहे.
पुण्यातील विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला आकारणीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रांगोळी काढण्यात येत असते. यंदाच्या वर्षी सायबर क्राईम ही थीम घेऊन विसर्जन मार्गावर रांगोळी काढण्यात येत आहे. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सायबर क्राईम ची निगडित विविध संदेश देणाऱ्या रांगोळी या राष्ट्रीय कला अकादमी तर्फे काढण्यात येत आहे.