पुण्यात मानाच्या गणपतींचे विसर्जन आता पार पडले आहे.दहा दिवस पाहुण्या म्हणून आलेल्या बाप्पाला निरोप देताना भाविक आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळून आले. आणि साश्रुनयनांनी सगळ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
तांबडी जोगेश्वरी ढोलवाद्य पथकातील मुख्य आकर्षण कथकल्ली वेषभूषा सगळ्यांचे मुख्य आकर्षण ठरली.पुण्यातील अलका चौकात यावेळी भव्य रांगोळी काढण्यात आली होती . ही भव्य रांगोळी पुणेकरांचे आकर्षण ठरले.
यंदाच्या गणपती विसर्जनाला विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील पोलीस बंदोबस्तात तृतीयपंथ्यांचाही समावेश दिसून येत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसले.