नंदुरबारमध्ये डीजेला फाटा देत पारंपरिक असलेल्या सनई-संबळ, हलगीच्या तालावर गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. पारंपारिक वाद्याच्या तालावर तरुणाई लेझीम नृत्यावर थिरकताना बघायला मिळाली.
खासदार हिना गावित यांनी मिरवणुकीत सहभागी होत तरुणींसोबत लेझीम नृत्याचा आनंद घेतला.पहिल्या मानाचा गणपती असलेल्या दादा गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.नंदुरबार जिल्ह्यात २१७ सार्वजनिक गणेश मंडळाचे तर अनेक खाजगी गणेश मंडळाच्या बाप्पाला आज निरोप दिला जात आहे.
मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचे लेझीम पथक दिसून आले.