पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत या वर्षी इतिहास घडला. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ पहिल्यांदाच मिरवणुकीच्या दिवशी दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर दाखल झाले आणि काही तासातच रात्री ९ वाजता दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाले.
मात्र दगडूशेठ गणपतीचे विसर्जन लवकर झाल्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रोड वरची मिरवणूक लवकर संपेल ही शक्यता मात्र चुकीची ठरली,तब्बल २५ तास ही गणेश मिरवणूक रेंगाळली असून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या मंडळाची संख्या अजून २०० अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. गेल्या १ तासात पोलिसांनी तब्बल ७० ते ८० गणेश मंडळांना विसर्जनासाठी अलका टॉकीज मधून पुढे ढकलले आहेत. संपूर्ण विसर्जन मिरवणूक संपायला अजून १.५० तास लागण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे.