लालबागच्या राजाचे आज तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर आज विसर्जन झाले. गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला साश्रू नयनांनी गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती. हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं विसर्जन केलं. लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता.
कोळी बांधवांकडून लालबागचा राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी पाहायला मिळाल्या. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात जात लालबागचा राजाचं विसर्जन झाले.यावेळी पोलिसांचा देखील बंदोबस्त होता.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील दीपक केसरकर हेही उपस्थित होते.