चीनमध्ये चालू असलेल्या एशियन गेम्स २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत ३२ पदके जिंकली आहेत. त्यात ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि १२ कांंस्य पदकांचा समावेश आहे.
नुकतेच भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने पुरूष ५० मीटर रायफल 3 पोजिशन प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. ऐश्वर्यने आतापर्यंत एशियन गेम्समध्ये चार पदके पटकावली आहेत. त्याने २सुवर्ण, १रौप्य आणि १ कास्य जिंकले आहे
महिलांच्या 60 किलो सांदा वुशू या क्रीडाप्रकारात भारताच्या रोशिबिना देवी नाओरेम हिने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक मिळवले आहे.
घोडेस्वारीमध्ये इक्वेस्टेरियन ड्रेसेज वैयक्तिक प्रकारात भारताच्या अनुश अगरवाल्लाने कांस्य पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे एशियन गेम्समधील इक्वेस्टेरियन ड्रेसेज वैयक्तिक प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक आहे.
इक्वेस्टेरियनमध्ये भारताने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक अशी दोन पदके जिंकली आहेत. रोईंगमध्ये भारताने 2 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी 5 जिंकली. तर सेलिंगमध्ये एक रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत.