पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अखेरीस संपली आहे. यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणूक ३० तास १० मिनिटे चालली… गुरवारी सकाळी साडे दहाला सुरूवात झालेली विसर्जन मिरवणूक शुक्रवारी ४ वाजून ४० मिनीटे चालली.चालली आहे. थोड्याच वेळापूर्वी शेवटचा गणपती मार्गस्थ झाला आहे.
काल सुरु झालेली विसर्जन मिरवणूक आज लक्ष्मी रोड चांगलीच रेंगाळली डी जे वरून मिरवणूकाचा दणदणाट आज सुरूच असलेला पाहायला मिळाला . काल साडेचार वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले.
मात्र त्यानंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीनंतर या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला.
पुणे पोलिसांनी वारंवार बैठका घेऊन देखील इतर मोठ्या मंडळांनी साथ न दिल्यामुळे ही मिरवणूक चांगलीच रेंगाळली.