बलुचिस्तानच्या नैऋत्य प्रांतातील एका मशिदीजवळ आज लोक ईद-ए-मिलाद निमित्त जमले असताना हा स्फोट झाला आहे.ह्या आत्मघाती हल्ल्यात ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी मस्तुंग जिल्ह्यात झाली.
या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात झालेल्या स्फोटात एका प्रमुख मुस्लिम नेत्यासह किमान अकरा जण जखमी झाले होते. जुलैमध्ये, उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका धार्मिक राजकीय पक्षाच्या मेळाव्यात झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 40 हून अधिक लोक ठार झाले होते.
नमाज पठण करण्यासाठी मशिदीत जमले असताना हा बॉम्पस्फोट झाला.असिस्टंट कमिश्नर अताउल्लाह मुनीम यांनी सांगितले की घटनास्थळी लोकांची गर्दी असल्याने या बॉम्बस्फोट मृतांचा आकडा वाढला आहे