वनडे वर्ल्ड कप 2023 आधी वॉर्म-अप सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला नमवले होते आज यजमान भारतीय संघ गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्मअप सामन्याला आज गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दुपारी दोन वाजता सुरवात होणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत १०६ वनडे सामने झाले आहेत.यामध्ये भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ५७ वेळा विजय मिळवला आहे. तर इंग्लंडला ४४ वेळा विजय मिळवता आला आहे. वॉर्मअप सामन्यात दोन्ही संघाची लढत पाहण्यासारखी असेल यात शंकाच नाही.
या सामन्यासाठीचे भारत आणि इंग्लंडचे संघ, जाणून घ्या…
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स .