अनिल अग्रवाल यांच्या वेदांता लिमिटेड कंपनीने डिमर्जर करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या कंपन्या मूळ कंपनीतून डिमर्ज केल्या जातील. पॉवर, मेटल्स अॅल्युमिनियम, तेल आणि गॅस व्यवसायात गुंतलेली वेदांता कंपनी लिमिटेडपासून वेगळी केली जाईल आणि स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केली जाईल.
कंपनीकडून सांगण्यात आले आहे की , वेदांता अॅल्युमिनियम, वेदांता ऑइल अँड गॅस, वेदांता पॉवर, वेदांता स्टील फेरस मटेरियल्स, वेदांता बेस मेटल्स आणि वेदांता लिमिटेड या सहा वेगवेगळ्या कंपन्यांची यादी केली जाईल.
वेदांताने सांगितले की, वेदांता लिमिटेडच्या प्रत्येक शेअरसाठी, शेअरहोल्डर्सना नव्याने लिस्ट झालेल्या पाच कंपन्यांचा एक शेअर दिला जाईल.
वेदांता ग्रुप या निर्णयानुसार, व्यवसायांची ६ कंपन्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे (अॅल्युमिनियम, तेल आणि वायू, ऊर्जा आणि स्टील आणि इतर धातू).